लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : अल्पवयीन मुलीला कॉफीमधून गुंगीचे औषध देउन लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर युवा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सांगलीतील तीन कॉफी हाउसवर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली. काही कॉफीशॉपमध्ये अनैतिक प्रकार घडत असून संघटनेने कारवाईची सातत्याने केली होती. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षानंतर प्रकार समोर आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी टोकाचे पाउल उचलले. या प्रकरणी पोलीसांनी १६ जणांना ताब्यात घेतले आहे.

Abhishek Ghosalkar murder case, CBI,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे बोट
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
man meet on social media raped girl in pune
पुणे : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे का ? बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा संताप
Kalyaninagar accident case
कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष

विश्रामबागमधील शंभरफुटी रस्त्यावर असलेल्या एका कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलींला नेऊन तिला गुंगीचे पेय देउन चित्रीकरण केले. या आधारे लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार संबंधित पिडीतेने दिली. या प्रकरणी संशयित तरूण आशिष चव्हाण याला पोलीसांनी अटक केली आहे.

आणखी वाचा-उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुळजाभवानी दानपेटी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई

दरम्यान, कॉपी शॉपमध्ये गैरप्रकार होत असून याचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी युवा शिवप्रतिष्ठानच्यावतीने पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्बारे केली होती. मागणी केल्यानंतर अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसत होता. मात्र, त्यानंतर असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारीही होत्या. नव्याने हा प्रकार समोर आल्यानंतर आज विश्रामबाग परिसरातील तीन कॉफी शॉपवर युवा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कॅफेमध्ये घुसून आतील साहित्याची मोडतोड करत फलकाचे नुकसान केले. कॅपेमधील खुर्च्या, पडदे, टेबल बाहेर आणून मोडून टाकण्यात आले. शहरातील कॅफे हँग ऑन, सन शाईन कॅफे, कॅफे डॅनिस्को या विश्रामबाग परिसरातील तीन कॅफेमध्ये घुसून जोरदार तोडफोड केली. या तोडफोड प्रकरणी युवा शिवप्रतिष्ठानच्या १६ कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा-एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा

शहरातील कॅफेमध्ये तरूणांच्या अश्‍लिल कृतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून यावर कठोर कारवाईची वारंवार मागणी करण्यात येत होती. असे प्रकार युवा शिवप्रतिष्ठान चालू देणार नाही असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतरही हा प्रकार समोर आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी टोकाचे पाउल उचलले असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले. असे प्रकार पुन्हा आढळून आल्यास अशाच पध्दतीने उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.