महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४व्या वर्धापनाचा कार्यक्रम पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील विष्णूदास भावे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारच्या कामावर नजर ठेवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेट तयार करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. यात अमित ठाकरे यांच्यावर आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेल्या पर्यटन मंत्रालयाच्या कामावर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबरोबर मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान, ग्रामविकास, मदत व पुर्नवसन, वने, नगरविकास आदी खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे कुटुंबातीलच दोन भाऊ कामांवरून आमनेसामने येताना दिसणार आहे.

मनसेचं शॅडो कॅबिनेट

गृह विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,
मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
वित्त आणि गृहनिर्माण : नितिन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे,
मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
सहकार पणन : दिलिप धोत्रे, कौस्तुभ लिमये
अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव
मत्स्यविकास : परशुराम उपरकर
महिला व बालविकास : शालिनी ठाकरे
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे
सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता
सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर
कौशल्य विकास : स्नेहल जाधव