शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. यावरती शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाष्य केलं आहे.
“केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव एकनाथ शिंदेंना गटाच्या शिवसेनेला दिलं. ४० आमदार आणि १२ खासदारांच्या भावनेची आयोगाने कदर केली. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर केलेल्या युतीने शिवसेनेत दरार निर्माण केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे,” असे शहाजी बापू पाटलांनी सांगितलं.
“ही आमच्यासाठी दु:खद घटना”
‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “अंधेरी पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून लढवणार आहोत. निवडणूक आयोगाकडे आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह मागितलं होतं, पण ते मिळालेलं नाही. ही आमच्यासाठी एक दु:खद घटना आहे. कारण, शेवटी बहुमतावर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असतं. ज्यापक्षाकडे विधीमंडळात बहुमत आणि संघटनात्मक बहुमत असतं त्याला चिन्ह मिळतं. कारण, चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभेत जवळपास ७० टक्के बहुमत आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतांची आकडेवारीही आमच्याकडे होती,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.