संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. या विजयानंतर गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, या विजयानंतर शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी खास गुजराती भाषेतून शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Gujarat Election Result 2022 : “गुजरातच्या जनतेने ‘रेकॉर्ड’चा ‘रेकॉर्ड’ तोडून नवा इतिहास रचला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

काय म्हणाले शहाजी बापू पाटील?

“गुजरातमधील जनतेने सातव्यांदा भाजपाला निवडून दिले आहे. येथील जनतेने पुन्हा भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे. विक्रमी असा आजचा निकाल लागला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान पदाकडे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आज जागतिक पातळीवर गेले आहे. जगाने त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्याचा स्वार्थ अभिमान गुजरातच्या जनतेने बाळगला आणि गुजरातच्या जनतेने भरभरून चहा विकणाऱ्या माणसाला मनापासून दिलेला आशीर्वाद आहे”, अशी प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे.

यावेळी गुजराती भाषेतून तुम्ही शुभेच्छा कशा द्याल? असं विचारलं असता, “भाजपानू कमळ फरी एक बार खिलाया, गुजरात जनतेनू बद्दल खूप अभिनंदन” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 Live: जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार; वाचा प्रत्येक अपडेट

दरम्यान, आज गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत १८४ पैकी १५७ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये पहिल्यांदाच निवडणुका लढवत असलेल्या आम आदमी पक्षाला ५ जागांवर विजय मिळाला आहे.