मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या दीपोत्सवाच्या आकर्षक रोषणाईने शिवाजी पार्क लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेलं होतं. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरती शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, “मनसेबरोबर युती करण्यास कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षाची विचारसारणी एक म्हणजे, हिंदू आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी कोणतीही राजकीय अडचण नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ

दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लागण्याची शक्यता आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर “राजकीय विश्लेषक, पत्रकार यांचेही मत आहे की, १९९५ साली आमदार झालेले तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. राजकीय अभ्यास आहे, महाराष्ट्रात तुम्ही फिरला आहात. त्यामुळे तुम्हाला मंत्रिपद मिळावे. मात्र, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील,” असेही शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.

Story img Loader