वाई:परंपरेप्रमाणे साताऱ्यात आज शाही दसऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भवानी तलवारीची राजपथावरून शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावर्षीच्या साताऱ्यातील दसरा सोहळ्यामध्ये शासनाने ही सहभाग नोंदविला होता.मोठ्या उत्साहात दसरा सण साजरा झाला.प्रथेप्रमाणे आजही आज साताऱ्यात जलमंदिर येथे शाही सिमोलंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन झाल्यानंतर सोहळ्याच्या सुरवातीस जलमंदीर राजवाडा येथे भवानी तलवारीस पोलीस विभागाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.
हेही वाचा >>> “हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांच्या करपट ढेकरांना विचारांचे सोने..”, आशिष शेलारांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली
यानंतर भवानी तलवारीची पालखीतून,हत्ती घोडेस्वार ऊंट आणि पारंपारिक वेशातील मावळ्यांच्या सहभागात पारंपरींक वाद्ये,ढोल ताशांच्या गजरात, तुतारी,छत्र चामरे आदींसह जलमंदिर ते पोवई नाका शिवतीर्थ अशी राजपथावरून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सातारा वासीय मोठ्यासंख्येने उपस्थित होते. राजघराण्याशी संबंधित व सातारकर नागरींक,कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा >>> “मर्द आहात हे सांगावं का लागतं?”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल; म्हणाले, “हुजरे आणि कारकुनांची…”
या निमित्त पोवाडयाचा कार्यक्रम व मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या शाही दसरा मिरवणुकीने साताऱ्याला वेगळी झळाळी आली होती. शिवतीर्थ येथे मिरवणूक दाखल झाल्यानंतर भवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर आकर्षक आतषबाजी करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभाव आणि महाराजांची शिकवण पुन्हा एकदा आत्मसात करण्याची गरज आहे. दरवर्षी आम्ही शाही दसऱ्याचे आयोजन करत असतो.यावर्षी शासनाने या सोहळ्यात सहभाग नोंदविल्याने या परंपरेचा सन्मान झाला असे मत व्यक्त केले.