Shahu Chhatrapati on Madhurimaraje Chhatrapati : ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघात उमेदवारीवरून सुरू असलेला महाविकास आघाडीतील गोंधळ सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षासाठी आणखी मानहाणीचा ठरला. सुरुवातीला उमेदवारीवरून गोंधळ, मग राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी. पुन्हा यातून नाराजी होत पक्षाच्या आमदार जयश्री जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देणे आणि यावर कळसाध्याय होत ऐनवेळी अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी पक्षाला न कळवताच माघार घेणे या साऱ्यांमुळे काँग्रेस पक्षासाठी कोल्हापुरातील आजचा दिवस मानहाणीचा ठरला. यावरून आता मधुरिमाराजे छत्रपती यांचे सासरे आणि खासदार शाहू छत्रपती यांनी निवदेन सादर करून स्पष्टीकरण दिलं आहे.

…याशिवाय अन्य कोणतंही कारण नाही

“सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी माघार”, असं म्हणत शाहू छत्रपती म्हणाले, “काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही.”

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe
Balasaheb Thorat : “…म्हणून ते चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रम होता”, बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर हल्लाबोल
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >> ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये काँग्रेस अनुत्तरीत! काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांची परस्पर माघार

…म्हणून अखेरच्या क्षणी निर्णय घेतला

“एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला”, असंही शाहू छत्रपती म्हणाले.

महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्याकरता एकत्रितपणे प्रयत्न करणार

“काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत. सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सतेज पाटलांशी वाद नाही

“माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उ‌द्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो”, असं म्हणत त्यांनी नाराजीच्या चर्चांवर पूर्णविराम दिला.

राजीनामा देणार असल्याचे वृत्त खोटे

“विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे”, असंही स्पष्टीकरण शाहू छत्रपती यांनी दिलं.

Story img Loader