दिल्ली येथे आयआयटी तसेच राष्ट्रीय रोबोटिक्स चॅम्पियनशिप व वर्कशॉप सिरीज रोबोसॅपियन प्रा. लि. यांच्या वतीने आयोजित ‘रोबोथ्रिस्ट २०१३’ स्पर्धेत येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले.
संपूर्ण भारतातून विभागीय फेऱ्या पार पडल्यानंतर महाराष्ट्रातून एकूण चार संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यात नाशिक शहरातून एक, नागपूर शहरातून एक व पुणे शहरातून दोन संघांची निवड करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकचे प्राध्यापक शीतलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी तपकिरे, प्रियंका पवार, प्रियंका जाधव व सोमनाथ पवार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विभागीय फेरीत तब्बल ३५० गट सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकने विभागात प्रथम क्रमांक मिळवीत अंतिम ३० मध्ये स्थान मिळविले. दिल्ली येथे झालेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातून गेलेल्या चार गटांपैकी केवळ नाशिकच्या गटाने अंतिम फेरीत स्थान मिळविले.

Story img Loader