मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका शिवसेनेचे माजी आमदार शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली. पण मुख्यमंत्र्यांना लढण्यासाठी इतर बरेच विधानसभा मतदारसंघ असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा! पृथ्वीराज चव्हाण तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी राजीनामा देऊन पृथ्वीराजबाबांना निवडणुकीसाठी जागा रिकामी करून द्यावी, अशी मागणी शंभुराज यांनी स्वत:हून केली होती. दरम्यान, विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केल्याचा मुद्दा उपस्थित करून देसाई यांना छेडले असता ते बोलत होते. त्या वेळी आपण केलेले वक्तव्य त्या परिस्थितीच्या अनुषंगाने होते असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीवर शंभुराज यांची सावध भूमिका
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका शिवसेनेचे माजी आमदार शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली.
First published on: 15-10-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj aware on the role of candidacy of the chief minister