मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका शिवसेनेचे माजी आमदार शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली. पण मुख्यमंत्र्यांना लढण्यासाठी इतर बरेच विधानसभा मतदारसंघ असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा! पृथ्वीराज चव्हाण तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी राजीनामा देऊन पृथ्वीराजबाबांना निवडणुकीसाठी जागा रिकामी करून द्यावी, अशी मागणी शंभुराज यांनी स्वत:हून केली होती. दरम्यान, विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केल्याचा मुद्दा उपस्थित करून देसाई यांना छेडले असता ते बोलत होते. त्या वेळी आपण केलेले वक्तव्य त्या परिस्थितीच्या अनुषंगाने होते असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा