शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदार संघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान देत आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढण्याचं आव्हान देत आहे. राऊत यांना एकनाथ शिंदे गटातील आमदारांकडून प्रत्युत्तरं मिळू लागली आहेत. दरम्यान, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, “संजय राऊत आमच्या (आमदारांच्या) मतांवर निवडून आले आणि राज्यसभेचे खासदार झाले. त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी. आमच्याशिवाय त्यांनी खासदार होऊन दाखवावं. ते आम्हाला गद्दार म्हणतात. परंतु ते आमच्याच मतांवर खासदार झालेत.”

देसाई म्हणाले की, “आम्ही नियमांचे, घटनेचे, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही ही भूमिका घेतली आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये ज्या तरतूदी आहेत त्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे.”

हे ही वाचा >> “२०१३ अन् २०१८ साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…”, शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

“त्यांना पक्ष बळकावता येणार नाही”

देसाई म्हणाले की, “आमच्यासोबत आमदार खासदार जास्त आहेत, त्यामुळे ते पक्ष बळकावू शकणार नाहीत. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला माहिती असेल. दोन्ही बाजूचे लोक न्यायालयात गेले आहेत. दोन्ही बाजूच्या लोकांनी न्याय देवतेवर विश्वास ठेवायला हवा.” हे सांगत असताना देसाई यांनी विश्वास व्यक्त केला की, न्यायलयाचा निकाल शिंदे गटाच्याच बाजूने लागेल. ते म्हणाले की, ५५ पैकी ४० आमदार आणि १८ पैकी १३ खासदार आमच्या बाजूने आहेत.

Story img Loader