एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदार शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. पण आमची सहनशीलता संपली तर उद्रेक होऊ शकतो, असे संभुराज देसाई म्हणाले आहेत. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हेही वाचा >> मोठी बातमी! पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
“आम्ही अजूनही शांत आहोत. पण आमच्या सहनशीलतेची मर्यादा संपली किंवा आमचे समर्थक आक्रमक झाले तर उद्रेक होऊ शकतो. एकनाथ शिंदे राज्याचे नेतृत्व करत असताना राज्यात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच सामान्य लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत. अशा प्रकारे आततायीपणा सुरु असेल दुसरी बाजू किती दिवस शांत राहणार आहे. तुम्ही तुमची बाजू मांडा आम्ही आमची बाजू मांडत आहोत. तुम्हाला राष्ट्रवादी पुरस्कृत माणसं आणून दौरे करावे लागत आहेत,” असे शंभुराज देसाई म्हणाले.
हेही वाचा >> “…याचा अर्थ राऊतांचा कार्यक्रम संपलाय” शरद पवारांच्या मौनावरून बंडखोर आमदार संजय शिरसाटांचं मोठं विधान
“उदयम सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद त्यांना पाहवत नाही. आम्ही जनमाणसांतून पुढे आलो आहोत. आम्ही कायदा कधीही हातात घेतलेला नाही. आम्ही शांत आहोत. तशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिल्या आहेत. आम्हाला मिळणारा पाठिंबा त्यांना पाहवत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असेही शंभराज देसाई म्हणाले.