वाई : शिवतीर्थाला कोणताही धक्का न लावता  लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने  नव्याने आयलँड तयार करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले. सातारा शहरातील शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्वी परंतु आत्ता काढून टाकण्यात आलेल्या आयलँड त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड सुशोभीकरण करण्याबाबत आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?

हेही वाचा >>> “माझ्यासारखा मुख्यमंत्री तुम्ही पाहिला आहे का?” एकनाथ शिंदे यांचं विधान, म्हणाले “मी रस्त्यावर…”

युनायटेड वेस्टर्न बँकेचे पूर्वी एक आयलँड होते हे आयलँड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगीचा यासह अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून आयलँड तयार करण्यात येणार आहे. याबाबत राजघराण्याची काय शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले. दरम्यान या शिवतीर्थ परिसरात स्मारक आणि चौकाच्या नामांतरावरून वाद याविषयी आयोजित बैठकीपूर्वी शहरातील ॲड दत्ता बनकर विकास पवार विनीत पाटील किशोर शिंदे सागर साळुंखे संदीप शिंदे आदी शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन शिवतीर्थ परिसरात आयलँड विकसित करण्याच्या विरोधात त्यांना निवेदन दिले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अजित पवारांच्या ‘या’ विश्वासू आमदाराची भेट; चर्चेला उधाण

साताऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या परिसरात कोणतेही अन्य काम करू नये असे निवेदनात सांगण्यात आले होते. आजच्या बिठकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन बबन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बैठकीपूर्वी खा.उदयनराजे भोसले समर्थक आणि पत्रकारांना नियोजन भवन परिसरातून बाहेर काढण्यात आले होते त्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या आजोबांनी शिवतीर्थ उभारले तेव्हा शिवतीर्थ नाव बदलून  कोणाचं देणार नसल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सकाळी बैठकीपूर्वी त्या वादावर पालकमंत्री शंभूराज देसाईंची भूमिका स्पष्ट केली होती.