Shambhuraj Desai on Guardian Minister : हिवाळी अधिवेशन पार पडताच गेल्या आठवडाभरापासून रखडलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी (२१ डिसेंबर) जाहीर करण्यात आले. ज्या गृह खात्यावरून एकनाथ शिंदे यांनी ताणून धरले होते, ते खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवले आहे. हा एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने शिंदे यांना दिलेला धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकाससह गृहनिर्माण आणि रस्ते विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ४२ मंत्र्यांना त्यांचे विरोधक गेल्या आठवडाभरापासून बिनखात्याचे मंत्री म्हणून हिणवत होते. अखेर काल या मंत्र्यांना खाती मिळाली आहेत. खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते, तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा मोठा दावा केला आहे. तर, भरत गोगावले म्हणाले, रायगडचं पालकमंत्रिपद मलाच मिळेल. शिरसाट व गोगावले यांच्या वक्तव्यामुळे खातेवाटप जाहीर होत नाही तोच आता महायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Dhananjay munde
Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले

हे ही वाचा >> Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण

पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार?

दरम्यान, राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन मंत्री तथा शिंदे गटातील नेते शंभूराज देसाई यांनी पालकमंत्रिपदावरून महायुतीत कोणतीही रस्सीखेच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच शंभूराज देसाई म्हणाले, “नुकतंच आमचं खातेवाटप पूर्ण झालं आहे. येत्या दोन दिवसांत आम्हाला आमची खाती सुपूर्द केली जातील. त्याचबरोबर काल विधिमंडळाचं अधिवेशन संपलं आहे. आता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या दोन दिवसांत मुंबईला जातील. तिथे एकत्र बसून चर्चा करतील. त्या चर्चेवेळी पालकमंत्रीपदांचं वाटप होईल”.

हे ही वाचा >> Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”

महायुतीत पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच?

शंभूराज देसाई म्हणाले, “राज्यातील जनतेने आम्हाला मोठं बहुमत दिलं आहे. आता आमच्यावर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेलं काम करून दाखवू. आमच्यामध्ये मंत्रिपदांवरून रस्सीखेच नव्हती, खातेवाटपावरून देखील रस्सीखेच नव्हती आणि आता पालकमंत्रिपदावरून देखील रस्सीखेच नाही.

Story img Loader