सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करत आलेल्या नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यांनी आजपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. दरम्यान, त्यांच्या उपोषणावर आता राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंभूराज देसाई यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मनोज जरांगे यांनी उपोषण न करता, सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले, “उपोषण करण्यापेक्षा…”

नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई?

“गेल्या महिन्यात मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं. तेव्हा मी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी तीन मागण्या मांडल्या होत्या. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचे वाटप आणि मराठा आंदोलकांवरील केस मागे घेण्याच्या मागणीचा समावेश होता. त्यांची भेट घेतल्यानंतर मी स्वत: संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसेच सगेसोयऱ्यांच्या ड्राफ्टबाबत माहिती घेतली. त्याचं काम आजही सुरू आहे, हैदराबाद गॅझेटबाबत तेलंगणा सरकारकडे आम्ही कागद पत्रांची मागणी केली आहे. तसेच गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्यावर सरकार काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

“मनोज जरांगे यांनी सामस्याची भूमिका घ्यावी”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना जे आश्वासन दिले आहे. ते सरकार नक्कीच पूर्ण करेन. त्या आश्वासनांपासून सरकार मागे हटलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी थोडी सामस्याची भूमिका घ्यावी. मराठा आक्षणाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आधीच १० टक्के आरक्षण दिले आहे. सरकार आरक्षणाच्याबाबतीत चालढकल करत नसून काम करत आहेत, आम्ही जी आश्वासनं दिले आहेत, ती नक्कीच पूर्ण करू”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : ‘लाडकी बहीण योजना सरकारचा डाव’, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “आता लाडकी मेहुणी..”

मनोज जरांगेंकडून लाडकी बहीण योजनेवर टीका; शंभूराज देसाई म्हणाले..

दरम्यान, मनोज जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. याबाबत शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. “मनोज जरांगे यांनी सरकारच्या चांगल्या योजनांवर टीका करू नये. मनोज जरांगे आरक्षणासाठी लढा उभा करत आहेत, त्यासाठी आम्ही त्यांच्या बाजुने आहोत. पण सरकारच्या चांगल्या योजनांवर टीका करण्याचे काहीही कारण नाही. सरकारने केवळ घोषणा केलेल्या नाहीत, त्यांची अंमलबजावणीदेखील सुरु केली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai reaction on manoj jarange patil hunger strike for maratha reservation spb