सोलापूर : महायुती शासन केवळ घरात बसून नुसत्याच थापा मारणारे नाही तर शासन आपल्या दारी या उपक्रमातून सामान्यजनांच्या प्रत्यक्ष दारी जाऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते लोकांच्या दारी कधीच न जाता स्वतःच्या घरी बसले होते. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वगुणांमध्ये मोठा फरक आहे, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

सोमवारी सोलापुरात भेटीस आलेल्या शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपध्दती आणि नेतृत्वगुणांमधील फरक उलगडून दाखविला.

डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
jitendra awhad talk on Constitution, jitendra awhad on Amit Shah, Amit Shah, jitendra awhad latest news,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”

हेही वाचा >>>सातारा: रिपब्लिकन पार्टीची फार राजकीय चर्चा होत नाही; रामदास आठवलेंची खंत

महायुती सरकारच्या ‘ शासन आपल्या दारी ‘ या उपक्रमावर उध्दव ठाकरे यांनी टीका करताना, ‘ शासन आपल्या दारी, थापा मारतंय भारी ‘अशा शेलक्या शब्दात भाष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. यापूर्वी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकांच्या दारी कधीही न जाता फक्त स्वतः च्या घरात बसले होते. सध्याचे महायुतीचे सरकार अजिबात थापा मारणारे नाही. शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरूवात आपल्या मतदारसंघातून झाली असता पहिल्याच दिवशी २९ हजार गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आला होता. तेव्हापासून ते काल परभणीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमापर्यंत तब्बल दीड कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घर बसल्या देण्यात आला, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

हेही वाचा >>>“आज मधूनच हिंदीत का बोलत आहात?” अजित पवारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांना हसू आवरेना; पण पुढच्याच क्षणी…

राज्यात उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्रिय राहून कार्यरत राहिलाआहे. त्यामुळे नजीकच्या काळात राज्य हातभट्टी दारूमुक्त होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उत्पादन शुल्क विभागात मोठी नोकरभरती केली जात असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले.

Story img Loader