विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अजित पवार भाजपात जातील किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात जातील अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. भाजपा नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार सातत्याने अजित पवारांबाबत वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. दरम्यान, अजित पवार अलिकडेच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटले असं बोललं जात आहे. दरम्यान, अजित पवार भाजपा किंवा महायुतीत येणार आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, त्यांच्यासारखं कोणी महायुतीत येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू.

शंभूराज देसाई म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि आमचं (शिवसेना – शिंदे गट) २०० प्लस जागा जिंकण्याचं (२०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचं) टार्गेट सेट आहे. त्यात अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. भाजपा, शिवसेना, आरपीआय, इतर मित्रपक्ष आणि अपक्ष अशी आमची महायुती आहे. ही महायुती अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात आणखी कोण येणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे.

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन
Devendra Fadnavis News in Marathi
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “आम्ही निवडणुकीत सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि..”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Image Of Jagdeep Dhankhar.
Jagdeep Dhankhar : “जग आपल्याकडे पाहत आहे, तरीही आपण…” संसदेतील गदारोळावर राज्यसभेच्या सभापतींची उद्विग्न प्रतिक्रिया

हे ही वाचा >> “महाराष्ट्रात भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता नाही”, गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य; म्हणाले, “२०२४ ला…”

“आमचं २०० प्लस जागांचं टार्गेट सेट”

शिंदे गटातील प्रमुख नेते शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही (महायुती) आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठीचं लक्ष्य तयार केलं आहे. आम्हाला २०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. या जागा २०० पेक्षा जास्त, २२५ किंवा २५० करण्यासाठी कोणी आम्हाला मदत करणार असेल, अधिक जागा निवडून आणण्यासाठी पाठिंबा देणार असेल, आमच्या महायुतीत भर पडून ती मोठी होणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. सध्या आम्ही २०० आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

Story img Loader