वाई:आमच्यावर पन्नास खोक्यांचा आरोप करणाऱ्या विरोधकांकडे आम्ही आता लक्ष देत नाही.आमची मागील बारा महिन्यातील विकास कामे ही त्यांना मोठी चपराक आहे अशी टीका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती घट्ट असून हे गतिमान सरकार आहे. सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरले आहे, असे सांगत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारच्या वर्षभरातील यशस्वी कामकाजांचा लेखाजोखा मांडला . येथील शासकीय विश्रामगृहात शंभूराजे यांनी राज्य सरकारच्या वर्षभराच्या कामांची माहिती देऊन विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या बारा महिन्यांमध्ये जे विकास प्रकल्प मार्गी लावले ते झाले नसते तर राज्य दहा वर्षे मागे जाण्याची भीती होती. काही नेत्यांनी घरातूनच कारभार हरकत महाराष्ट्राच्या भवितव्याचा निर्णय घेतला होता . रोज रोज टीका करणाऱ्या लोकांकडे आपण काय लक्ष देणार त्यांची टीका आता आम्ही गांभीर्याने घेत नाही एक लाख छत्तीस हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आणणारे मुख्यमंत्री हे विरोधकांना दिसत नाही काय. विरोधकांनी कधी सकारात्मक विचार मांडले आहेत नाहीत असा रोखठोक सवाल देसाई यांनी केला. एकनाथ शिंदे अयशस्वी मुख्यमंत्री आहेत अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली होती त्यावर बोलताना देसाई म्हणाले गेल्या बारा महिन्यांची विकास कामे झाली ती कामे अजित पवार यांना दिसत नाहीत काय त्यांच्या विधानाला नक्की आधार काय. वित्त राज्यमंत्री म्हणून मी सुद्धा महाविकास आघाडीत काम केले आहे त्यावेळी सुद्धा इतक्या गतीने निर्णय झाले नाही तितके गतीने निर्णय या शासनाच्या काळात झाले आहेत त्यामुळे त्यांच्या विधानाला फार महत्त्व राहत नाही.संजय राऊत यांच्या विधानांवर आम्ही फुली मारली आहे. ते एसी चेंबरमध्ये बसून तथ्यहिन बोलत असतात. तो चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असून त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी तब्बल ९६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. वार्षिक आराखडा हा १२ टक्क्याने वाढविण्यात आला असून ४६० कोटी रुपयांची तरतूद तसेच येथील पोवई नाक्यावरील शिवस्मारकाला १६ कोटी रुपयांचे अनुदान पाटण येथे खंडाळा नाशिकच्या धरतीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र, निरा देवधर सह पाणी योजनांना पाच हजार कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता. किल्ल्यांसाठी नियोजन मंडळातून दहा कोटीचा निधी, पायाभूत सुविधांसाठी ६० कोटी रुपये शेतकरी बांधवांना २४ तास वीज,, प्रतापगडावर भव्य स्वरूपाचा भगवा ध्वज, पोलिसांना सहा मिनी बस ५० दुचाकी, पाच पिढ्यांना भूकंप दाखले देण्याचा महत्त्वाचा निर्णय, शासन आपल्या दारी या माध्यमातून दोन लाख ७४ हजार ३४८ लाभार्थ्यांना मदत कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ जलयुक्त शिवार टप्पा दोन तसेच ३११२ कोटी रुपयांचा विमा हप्ता बारा लाख शेतकऱ्यांना चार हजार २८३ कोटीचे अनुदान वाटप अशा विविध महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धडाकेबाज निर्णयांचे तोंड भरून कौतुक केले