सांगलीत नीट परीक्षेच्या वेळी चिड आणणारी एक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रकार विद्यार्थिनींच्या बाबतीत घडला आहे. जेव्हा त्यांनी याबाबत आपल्या पालकांना सांगितलं तेव्हा संतापलेल्या पालकांनी याबाबत थेट तक्रार केली. तक्रार केल्यानंतर नेमकं काय घडलं आहे ते कळलं आहे. नीट परीक्षा सुरु असताना मुलींना कपडे आणि आणि त्यांची अंतर्वस्त्रे उलटी घालायला लावल्याचा हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं सांगलीमध्ये?

संपूर्ण देशात ७ मे या दिवशी नीट (NEET) ची परीक्षा पार पडली. सांगलीतली बहुसंख्य विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र सांगलीतल्या कस्तुरबा वालचंद हे महाविद्यालय ज्या विद्यार्थिंनीना केंद्र म्हणून मिळालं त्यांना अत्यंत धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागलं. कस्तुरबा वालचंद या महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी ज्या विद्यार्थिनी आल्या होत्या त्यांचे त्यांचे अंगावरचे कपडे आणि अंतर्वस्त्रे दोन्ही उलटे करुन परीधान करण्यास सांगितली. आधी या विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांना हे करायला सांगितलं. जे विद्यार्थिनींनी ऐकलं आणि कपडे उलटे घालून परीक्षा दिली.

सांगलीतल्या या केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे अंगावरचे कपडे आणि अंतर्वस्त्रे उलटी घालून परीक्षा द्यावी लागली. तीन तास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उलटे कपडे घालून नीटची परीक्षा देत होते. परीक्षा संपल्यानंतर ज्या विद्यार्थिनी बाहेर आल्या त्यांना उलट्या कपड्यांमध्ये पाहून त्यांचे पालक संभ्रमात पडले. याचं कारण विचारलं असता सगळा प्रकार त्यांना कळला. सुरक्षेचं कारण देऊन हे करायला लावलं असल्याचं सांगितलं. या नंतर या प्रकरणी पालकांनी थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे या प्रकाराची तक्रार केली आहे.

कस्तुरबा वालचंद महाविद्यालय या ठिकाणी जो प्रकार घडला त्याबाबत महाविद्यालय प्रशासनाने मात्र हात वर केले आहेत. नीट परीक्षेचा आणि महाविद्यालयाचा संबंध नाही आम्ही वर्ग उपलब्ध करून दिले आहेत असं महाविद्यालयाने सांगितलं. हा प्रकार कुणाच्या आदेशाने घडला? या सूचना कुणी दिल्या होत्या? याची चर्चा आता होते आहे. TV9 मराठीने हे वृत्त दिले आहे.

बंगळुरुतही घडली अशीच घटना

बंगळुरुतही NEET UG च्या परीक्षेत असाच प्रकार घडला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे आणि कपडे उलटे घालून परीक्षा द्यावी लागली. यासंदर्भात इथल्या विद्यार्थ्यांनीही नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. NTA कडे यासंदर्भातल्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shameful incident during neet exam in sangli the students were made to appear wearing reverse clothes and inners scj