Numerology And Mulank: अंकशास्त्राची निर्मिती जगात सर्वप्रथम आपल्या प्राचीन भारतात झाली. हाताची बोटे मोजता मोजता माणसाने गणिताचा पाया घातला आणि कालांतराने ज्योतिषशास्त्रातील ग्रहांच्या माध्यमातून संख्याशास्त्राचा जन्म झाला. संख्याशास्त्रात आपण माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश-अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य अशा अनेक गोष्टींचा अंदाज संख्याशास्त्राच्या साहाय्याने करू शकतो. यासाठी मूलांकाचा अभ्यास आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्यांचा मूलांक ठरतो. उदाहरणार्थ, १२ तारखेचा मूलांक १ + २ = ३ म्हणजेच तीन हा १२तारखेला जन्म झालेल्यांचा मूलांक असतो. आज आपण अशाच एका मूलांकाच्या लोकांचा स्वभाव पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मूलांक व शनीचे स्वामित्व

अंकशास्त्रानुसार सर्वात शक्तिशाली मूलांक म्हणजे ८ असतो. कारण या मूलांकावर शनीचा प्रभाव असतो. शनीचे स्वामित्व असल्याने या तारखेला जन्मलेल्या मंडळींना साडेसाती किंवा शनी पीडा सहन करावी लागत नाही असे म्हणतात.

८ जन्मतारीख असलेल्यांचा स्वभाव कसा असतो?

८ ही जन्मतारीख असणारे किंवा ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज ८ अशी होत आहे त्यांच्यवर शनीदेव प्रसन्न असतात. या मंडळींचा स्वभाव मेहनती व इमानदार असतो. मात्र ते कामाच्या बाबत जास्तच गंभीर असतात अन्य लोक जे त्यांच्यासारखे नसतील त्यांच्याशी पटवून घेण्यात त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागतात. या लोकांचे जीवन संघर्षांशिवाय पूर्ण होतच नाही पण त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळते हे ही खरे आहे. शनी हे कर्मदेव असल्याने त्यांच्या स्वामित्वाची मंडळी जसे कर्म करतील त्याच्या दुप्पटीने त्यांना लाभ व तोटा होऊ शकतो.

३५ वं वरीस मोक्याचं!

अंकशास्त्रानुसार, ८ जन्मतारखेच्या लोकांचा उत्कर्षाचा कालावधी हा आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात असतो. म्हणजेच वयाच्या पस्तीशीनंतर या मंडळींना प्रचंड लाभाची संधी असते. बालपण संघर्षात घालवल्यानंतर त्यांना तरुणपण व उर्वरित आयुष्य सुख अनुभवयाला मिळू शकते. ३५ व्या वर्षानंतर त्यांचे समाजातील स्थान सुद्धा अधिक भक्कम होत जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)