काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (१७ ऑक्टोबर) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर असे दोन दिग्गज नेते आमनेसामने आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होणार आणि कोण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाष्य केलं. तसेच खरगे की थरूर यापैकी कोण काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो यावर आपला अंदाज वर्तवला आहे. ते सोमवारी (१७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे निवडून येतील त्यात मल्लिकार्जून खरगेंचं नाव दिसत आहे. खरगे आणि आम्ही संसदेत एकत्र काम करतो. अनेक वर्षांपासून पक्षात संघटनात्मक काम करणारी व्यक्ती म्हणून खरगेंचा आम्हाला परिचय आहे. त्यामुळे साहजिक आहे की अशी व्यक्ती त्या ठिकाणी आली तर त्याचा परिणाम संघटनेच्या दृष्टीने चांगला होईल.”
“मीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो, पण…”
यावेळी पवारांनी ते काँग्रेसमध्ये असताना झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचीही आठवण सांगितली. ते म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये असताना बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो होतो आणि मी हरलो होतो. तेव्हा सीताराम केसरींना गांधी घराण्याचा पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक झाली नाही.”
“पक्षात संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात ही जमेची बाजू”
“हे चांगलं आहे की, काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पक्षात संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात ही जमेची बाजू आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
“निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे जिंकतील असं नाव दिसतंय”