राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. राजकीय दृष्टीकोणातून शरद पवार पवार भाजपाचे बाप आहे. भाजपा कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. याला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात आहेत, असं टीकास्र पडळकर यांनी सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार काय म्हणाले?

“शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात खालच्या स्तरावर टीका करत होते. तेव्हा, भाजपा निवांत एसीमध्ये बसून तमाशा पाहात होता. शरद पवार यांना ६० वर्षाचा राजकीय अनुभव आहे. ही खेळी शरद पवार यांच्यासमोर भाजपा टाकत असेल, तर राजकीय दृष्टीकोणातून शरद पवार भाजपाचे बाप आहेत. भाजपा कुटुंबआणि पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “तुमचा पाळीव कुxx लायकीपेक्षा…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा फडणवीसांना इशारा

“२०२९ नंतर राष्ट्रवादी पक्ष दिसणार नाही”

यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “रोहित पवारांना माहिती नाही की, शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात आहेत. ते कोणत्या कोपऱ्यात बसतील हे सुद्धा कळणार नाहीत. महाराष्ट्रात चालत असल्याने रोहित पवार बोलत राहतात. लोकांना भावनिक करण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग आहे. २०२४ सालीच हे दिसतील. २०२९ राष्ट्रवादी पक्ष आणि यांचे लोक दिसणार नाहीत.”

हेही वाचा : “मला एकतर पक्षातून काढून टाका, नाहीतर…”, नाराजीवर बबनराव घोलपांचा खुलासा; ठाकरे गटात अस्वस्थता?

“अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”

गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना धनगर आरक्षणाबाबत पत्र देण्याची गरज वाटत नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.