राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात झालेली भेट मागच्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. या भेटविषयी आज अजित पवार यांनी उत्तर दिलं. सोमवारी शरद पवार यांनीही उत्तर दिलं. तर आता शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विषयी उत्तर दिलं आहे. संभ्रमाचा काहीही प्रश्न नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी या भेटीवर सविस्तर उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

“नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण या दोन्ही गोष्टींमध्ये कुणीही गल्लत करु नये” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात वाद होतात, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच ऐकमेकांशी भांडण झालेलं नाही. गैरसमज नसावे” “मी स्वत: काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलली आहे. त्यामुळे इतरांनी कोणी चिंता करु नये. सांगोल्यातली पवारसाहेबांची सभा आणि पत्रकार परिषद बघितली असेल, तर मला संभ्रमाची स्थिती वाटत नाही”

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Ajit Pawar
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हे पण वाचा- “शरद पवार कुटुंबप्रमुख आहेत, त्या बैठकीला…”, अजित पवार यांचं स्पष्टीकरण

काय म्हणाले अजित पवार?

शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या आहे. आमच्या भेटीला राजकीय रंग का दिला जातो आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी कोल्हापुरात विचारला. तसंच मी कुठेही लपून गेलो नव्हतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

मी कुठेही लपून गेलो नाही

मी कुठेही लपून गेलो नाही असंही अजित पवार म्हणाले. मी कधी लपून कुणाला भेटायला गेलो? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. चोरडिया आणि आमचं दोन पिढ्याचं नातं आहे. चोरडिया हे शरद पवार यांचे वर्गमित्र आहेत. त्यांनी शरद पवार यांना जेवायला बोलवलं होतं. त्यावेळी जयंत पाटीलही त्या ठिकाणी शरद पवारांबरोबर होते. दोन पिढ्या ओळखीच्या माणसाच्या घरी भेटायला जाण्यात काय चूक आहे? उगाच काहीतरी गैरसमज निर्माण करण्याचं काम करु नये असं अजित पवार म्हणाले. मी ज्या कारमध्ये होतो त्या कारला अपघात झाला नव्हता. मी लपून कशाला कुठे जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा आहे. असंही अजित पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांना सांगितलं.

हे पण वाचा- शरद पवारांची भेट चोरडियांच्याच घरी का घेतली? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवणही केलं. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते अशी चर्चा आहे. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसऱ्याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये यावेळी दीर्घ चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यानंतर विविध चर्चा होऊ लागल्या होत्या. आता अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. तर आता सुप्रिया सुळेंनीही यावर स्पष्टीकरण दिलं आहे.