Prakash Ambedkar Comment on Sharad Pawar and Ajit Pawar : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आहे. मनोज जरांगेंनी आजच उपोषण सोडलं आहे, आपण आता विधानसभेची तयारी करणार असे संकेत जरांगेंनी दिले आहेत. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजासाठी आंदोलन सुरु केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या यात्रा लवकरच सुरु होणार आहेत. अशात प्रकाश आंबेडकर यांनी श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा पक्ष असं म्हटलं आहे.

पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका ( Prakash Ambedkar )

महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन हे दोन समाज आमने-सामने आले असून त्यावरून गावागावात आणि नेत्यांमध्येही जातीय तणाव पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी वंचित आरक्षण बचाव यात्रा काढली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
Sharad Pawar Speaking At Markadwadi.
Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

हे पण वाचा- प्रकाश आंबेडकरांची आता ओबीसी समाजाला साद

शरद पवार, अजित पवारांचा पक्ष म्हणजे श्रीमंत मराठे

“महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा हे दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, अशावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत, श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष,काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष असे आहेत. तर कायस्थ प्रभूंचे पक्ष म्हणजे भाजपा आणि शिवसेना उबाठा यांचा पक्ष आहे. यामुळेच आम्ही आता गुरुवारपासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत. चैत्यभूमीवरुन ही यात्रा सुरु होईल, मग पुण्यात फुले वाडा, नंतर अनेक जिल्हे करत पुढे औरंगाबाद येथे ७ ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होईल”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी दिली.

Sharad Pawar on Ajit Pawar
अजित पवार, शरद पवार, यांच्याव प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका (फोटो-संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रातला ओबीसी समाज घाबरला आहे, आरक्षण जाण्याची त्यांना भीती

“महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा सध्या घाबरला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ओबीसी कार्यकर्त्यांवर हल्ला होत आहे. राज्यात अशा घटना घडू नयेत आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी आमची भूमिका आहे. मनोज जरांगे हे थेट आरक्षण द्या किंवा आरक्षण रद्द करा म्हणत आहेत. या परिस्थितीत ओबीसींना त्यांचं आरक्षण जाईल असं वाटतं आहे.” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Story img Loader