राज्यात सध्या वारीचा उत्साह सुरू आहे. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या वारीत राजकीय नेतेही सहभागी होताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसेचे (अ.प.गट) नेते अजित पवार देखील आज वारीत सहभागी झाले. दरम्यान, यावरून आता शरद पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. यावेळी शरद पवार यांनी रशियातील एका महिलेचा किस्साही सांगितला. ते बारामतीत एका कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“कान्हेरी येथील मारुती मंदिरात सोनोपंत दांडेकर हे विना वाजतात. त्यांनी संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं आहे. या ठिकाणाहून संत विचारांचा संदेश दिला जातो. इथे कोणताही जातीभेद नसतो. विशेष म्हणजे आपल्या संतांचा विचार हा महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही, तर जगभरात पोहोचला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी भाजपाचे राजू शिंदे ठाकरे गटात? खैरेही इच्छूक? नाराजी व्यक्त करत म्हणाले…

“माणसाला योग्य दिशेने नेण्याचं काम, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे काम या संतांनी केले आहे. हा आपल्या भारताचा ठेवा आहे आणि आपण तो जतन करतो आहे, याचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

पुढे त्यांनी रशियातील एका महिलेचा किस्सा सांगत अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला. “संतांचा विचार हा केवळ देशापूरता मर्यादित राहिला नसून तो देशाच्या बाहेरही गेला. केंद्रीय मंत्री असताना मी एकदा रशियात गेलो होते. त्यावेळी तिथल्या काही लोकांनी माझी ओळख एका महिलेशी करून दिली. ती महिला माझ्याशी चक्क मराठीत बोलत होती. त्यांच्याशी बोलताना समजलं की त्या वर्षातून एकदा पंढरपूरला वारीला येतात, त्या महिलेचं मला कौतुक वाटलं”, असं शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – राज्यातील ओबीसी-मराठा वादावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर आरक्षणाठी…”…

पुढे सांगताना ते म्हणाले, “ज्यावेळी त्या महिला पुढच्या वर्षी वारीला आल्या, तेव्हा मी त्यांना माझ्या घरी बोलवलं होतं. इतरही काही महिला त्याठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी त्या रशियातील महिलेला विचारलं, की तुम्ही वारीला कुठून जाता, पुण्यातून की सासवडमधून,त्यावर रशियातील महिलेनं उत्तर दिलं की वारी ही पुण्यातून किंवा सासवडमधून निघत नाही, तर तुकोबांच दर्शन घेऊन पंढरपूरला पोहोचते, त्याला वारी म्हणतात आणि जे अधून मधून जातात, त्याला हौशे नवशे गवसे म्हणतात”, असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी अप्रत्यक्ष टोलाही लगवला.