पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अपंगांना दिव्यांगजन हा पर्यायी शब्द दिला आहे. दिव्यांगजनांचे नोकरीतील आरक्षण चार टक्के करण्यात आले असून, राज्य आणि केंद्र सरकारमधील दिव्यांगजनांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणू रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते. दृष्टिहीन आणि विवीध दिव्यांगजनांसाठी मागील पाच वर्षांत केंद्र सरकारने आठ हजार एडीप कॅम्प लावून १३ लाख ५४ हजार दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणांचे वाटप केले आहे अशी माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.

कपडयांबद्दल काय म्हणाले रामदास आठवले?

हेमंत टाकले यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाशी आमची युती नाही.पक्षाची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्री कायम जपण्याचे काम हेमंत टाकले यांनी केले आहे. त्यांच्या निमंत्रणावरून या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याचे रामदास आठवले म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संसदेत मला भेटले की, नेहमी माझ्या कपड्यांचे कौतुक करतात. त्यामुळे राजकारणापलीकडे मैत्री जपली पाहिजे असं सांगत जे कधीच कुणापुढे नाही झुकले त्यांचे नाव आहे हेमंत टकले ! अशी शीघ्र कविता रामदास आठवले यांनी यावेळी सादर केली. यावेळी रामदास आठवले यांचा नॅब संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

Story img Loader