Laxman Hake News मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचं म्हणाले. अशात ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत, माझ्याकडून हवं तर लिहून घ्या. तसंच जरांगे आणि शरद पवार यांची लाईन एकच असल्याचंही लक्ष्मण हाके म्हणाले.
काय म्हणाले लक्ष्मण हाके? ( What Laxman Hake Said? )
“मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळींना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरली आहे. जरांगे मुख्यमंत्र्यांना, आई बहिणीवर शिव्या घालाव्यात ही काही निवडणूक लढवण्याची साधनं आहेत का?” असं लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी विचारलं आहे.
मनोज जरांगे निवडणूक लढवू शकत नाहीत
“मनोज जरांगेंनी जरी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असले तरीही माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या की मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत. ज्या मागण्या मान्य होणार नाहीत अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून शिवराळ भाषा वापरणारा हा माणूस तारीख पे तारीख देऊ शकतात बाकी काहीही करु शकत नाहीत. निवडणुकीत कोणाच्या विरोधात त्यांनी प्रचार केला हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करतील, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेलही नाही शरद पवार आणि त्यांची एकच लाईन आहे असं लक्ष्मण हाकेंनी Laxman Hake म्हटलं आहे.
हे पण वाचा- Laxman Hake On Manoj Jarange : “मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना आणा”, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
मनोज जरांगे आणि शरद पवारांची लाईन एकच
मनोज जरांगे यांना ओबीसी समाजात फूट पाडायची आहे, त्यांना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे, शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. ओबीसीमध्ये साडेतीन टक्के आरक्षण धनगर समाजाला मिळतं. सर्वाधिक वाटा असतानाही आम्ही ओबीसींच्या आरक्षणाबाबत का लढू नये, असा सवाल उपस्थित करत असतानाच ओबीसी आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र जरांगेचं असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगेंचं उपोषण मागे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेलं बेमुदत उपोषण स्थगित केलं आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं असून त्यांची प्रकृती ढासळल्याने बेमुदत उपोषण स्थगित केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच प्रकृती ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.