उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. की पवार आडनाव दिसेल तिथे मतदान करा. तसंच अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या भावंडांनाही इशारा दिला होता. मी फार तोलून मापून बोलतो आहे तोंड उघडलं तर तुम्हाला मग काही बोलता येणार नाही असं अजित पवार म्हणाले होते. आज शरद पवार यांना सुनेत्रा पवारांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत खास आपल्या स्टाईलने उत्तर दिलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले होते. “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल”, असे अजित पवार म्हणाले होते.

Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
dhule police arrest two for carrying swords and choppers with intention to create terror
धुळ्यात दहशतीसाठी तलवारी, चॉपरचा वापर
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
sharad pawar babanra shinde ajit pawar
Babanrao Shinde : शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांच्या आमदाराची निवडणुकीतून माघार? माढ्यात काय शिजतंय?

हे पण वाचा- “शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”

“मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायाचा याचा विचार केला. सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा”, अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिली होती.

शरद पवारांनी काय उत्तर दिलं?

अजित पवार म्हणाले की पवार आडनावाला मतं द्या चुकीचं काय? एक गोष्ट लक्षात घ्या दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार दुसरा बाहेरुन आलेला पवार. असं उत्तर दिलं आहे. शरद पवार म्हणाले, निवडणूक आल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे लोक प्रचारात उतरतात. माझी निवडणूक असो, अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो. आमच्या कुटुंबातले घटक असतात. त्यामुळे अजित पवार जे म्हणाले की त्यांच्या वेळी प्रचाराला कुणी गेलं नाही ते काही खरं नाही. लोकांच्यात जातात, भूमिका मांडतात. लोकांचा सहभाग निवडणुकीत कसा होईल हे पाहतात. माझ्या कुटुंबातले जे घटक आहेत त्यांचे व्यवसाय हे सगळ्यांना माहीत आहेत. अजित पवार काय म्हणतात त्याची चिंता आम्हाला नाही. असंही शरद पवार म्हणाले.