Sharad Pawar : महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरेंसाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपावर आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदी ४०० पार खासदार निवडून द्या सांगत होते कारण त्यांना संविधान बदलायचं होतं असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. पक्ष उभा करायला ताकद लागते असं शरद पवारांनी ( Sharad Pawar ) म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

सध्या विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मी दिवसाला पाच ते सात सभा घेतो. लोकांना विचारलं की लोक सांगतात की पक्ष फोडाफोडी ही काही आम्हाला मान्य नाही. आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, मंत्री होते अजित पवार, मंत्री होते एकनाथ शिंदे, छगन भुजबळही मंत्री होते, असं मंत्रिमंडळ असताना एकनाथ शिंदेंनी ४० आमदार गोळा केले, गोहत्तीला जाऊन बसले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. सरकार पडलं आणि नवीन सरकार आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आज काय अवस्था आहे बघा, असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती? पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे आहे जास्त मालमत्ता
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांसह राजकीयदृष्ट्या एकत्र याल का?, अजित पवार म्हणाले, “आमचं नातं..”
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Abdul Sattar
Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”, मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानाचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Aditya Thackeray vidhan sabha
वरळीतील ठाकरे गटाच्या प्रचाराची भिस्त तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी उपमहापौरांवर

हे पण वाचा- Ajit Pawar : शरद पवारांसह राजकीयदृष्ट्या एकत्र याल का?, अजित पवार म्हणाले, “आमचं नातं..”

पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, उभा करायला लागते-शरद पवार

पक्ष फोडणं हा आणि सत्ता हाती घेणं हा लोकशाहीचा मार्ग आहे का? अनेक ठिकाणी लोक मला सांगतात की पक्ष फोडणं हे काही मला मान्य नाही. देवेंद्र फडणवीस मध्यंतरी एके ठिकाणी म्हणाले की मी फार मोठं काम केलं, मी दोन पक्ष फोडले. पक्ष उभा करायला अक्कल लागते, कष्ट लागतात. पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. या लोकांनी पक्ष फोडले. आज निवडणुकीत लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर या लोकांना चिंता वाटू लागली. त्यामुळे नवेनवे कार्यक्रम जाहीर केले, असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

लाडकी बहीण योजना आणली पण सुरक्षेचं काय?

या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. बहिणींना मदत केली तर माझी काही तक्रार नाही. पण प्रश्न मदतीपेक्षा दुसरा आहे. आज महाराष्ट्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार झाले. असं ऐकायला मिळतं की महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात ६०० हून अधिक महिलांचं अपहरण झालं आहे. महिलांची सुरक्षा हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही का? असा सवाल शरद पवारांनी ( Sharad Pawar )भाषणात केला.