लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : देशातील आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येणारे आहे. देशभर सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला असून, त्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली आहे. लोकसभेप्रमाणेच आता महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून सरकार बदलावे, अशी हाक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Why did industries move out of Hinjewadi ITpark Sharad Pawar told exact reason
हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद

बार्शी येथे रविवारी दुपारी झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजक विश्वास बारबोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

आणखी वाचा-बार्शीत ९० वर्षांच्या प्रभाताईंनी ८४ वर्षांच्या शरद पवारांना बांधली राखी

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा वर्षांपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर मागील दहा वर्षांत शेतीमालाला एकदाही दुप्पट भाव मिळाला नाही, तर उलट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्या. सरकारची शेतीविषयक धोरणे हिताआड येणारे आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक निर्णय घेऊन भाजपला त्यांची जागा दाखविली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही असाच निर्णय घ्यायचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकरी यांच्या हिताची जपणूक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार नसतील तर त्यांच्याशी भांडण करावे लागेल – मनोज जरांगे पाटील

यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यात कमी दरामुळे आणि जास्त उत्पादन खर्चामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २० हजार कोटींचा फटका सहन करावा लागला. तर कांदा निर्यातबंदीमुळे पाच हजार कोटींचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा निर्यातबंदीचा मोदी सरकारचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली दिली. परंतु अजित पवार यांनी भाजपच्या सोबत जाणे हेच मुळात चुकीचे होते. लाडकी बहीण योजना सरकारने घाई गडबडीत आणली आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद न करता उलट, त्याची व्याप्ती वाढविली जाईल, असेही आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.