शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्यामुळे अजित पवार पुन्हा माघारी फिरणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाले शरद पवार?
गुरुवारी सुप्रिया सुळेंनी पुण्यात बोलताना अजित पवार आमचे नेते असून पक्षात फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात बारामतीमध्ये शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता शरद पवारांनी त्या वक्तव्याचं समर्थन करताना पक्षात फूट पडली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
शरद पवारांनीही अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं मान्य केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. २०१९प्रमाणे अजित पवार पुन्हा माघारी येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. त्यासंदर्भात साताऱ्याच्या दहिवाडीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांना पुन्हा विचारणा केली असता त्यांनी हे विधान फेटाळतानाच अजित पवारांना पुन्हा संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
“पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं होतं की…”
“एकदा-दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती सरळ केली असेल तर सुधारणा करण्याची एक संधी द्यावी अशी भूमिका पक्षानं यापूर्वी घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले. “तुम्हाला आठवत असेल, एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही, आमच्याकडून चुकीची गोष्ट घडली, पुन्हा अशा रस्त्याने जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी म्हणून वेगळा निर्णय घेतला होता”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
“संधी वारंवार मागायची नसते”
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा असं होणार नाही हे ठरल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका मांडली आहे. “संधी वारंवार मागायची नसते, आणि मागितली तरी ती द्यायची नसते. आमची भूमिका स्पष्ट आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.