वाई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार पुढे पुढे ढकलत आहे, याचा अर्थ या सरकारला लोकांना सामोरे जायला भीती वाटते आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त आज साताऱ्यातील कर्मवीर समाधी परिसरात शरद पवार यानी अभिवादन केले. त्यावेळी अनिल पाटील, श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकुर, भगिरथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. यानंतर पवार साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

हेही वाचा – “काका मला वाचवा! हे म्हणायची वेळ अजित पवारांवर” श्रीकांत शिंदेंचा टोला

फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे साडेतीन जिल्ह्यातील जिल्ह्यांचा पक्ष आहे या वक्तव्यावर शरद पवारांनी आज समाचार घेतला. ते काहीही बोलू शकतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करण्यात वाकबगार आहेत. त्यातील ते एक आहेत.

राज्यात एकीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा राजकीय सामना चालू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्येही एकमेकांवर आरोप केले जात असल्याचं दिसून येत आहे. यावर पवार म्हणाले, आघाडीमध्ये सर्वजण सगळ्या मुद्द्यांवर सहमत असेलच असे होत नाही. सर्वांची ध्येय धोरणे वेगळी असतात त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त करत असतो.

सामनातील अग्रलेखातून पक्षात नव्या नेतृत्त्वाची फळी निर्माण कशी करायची, हे आमच्यातील प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही कुणाला संधी दिली, ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. मग त्यांनी सामनात काय लिहिलं त्याला आम्ही महत्त्व देत नाही. तो लिहिण्याचा त्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करतोय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यात आम्हाला समाधान आहे, असे पवार यांनी टीकेला उत्तर दिले.

कर्नाटकातील प्रचारात बजरंग बली की जय अशी घोषणा देऊन मते मागण्यात येत आहेत यावर बोलताना पवार म्हणाले, ज्यावेळी आम्ही निवडणुकीचा अर्ज भरतो, निवडून येतो शपथ घेती त्यावेळी आम्ही राज्यपाल, सभापती, लोकांच्या समोर शपथ घेतो. त्यावेळी आम्ही शपथ घेतो की, आमचा, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. जे आमदार झाले, मंत्री झाले. त्यांनीही या शपथा घेतल्या आहेत. पण धर्माच्या आणि जातीच्या नावाने मतं मागणं त्या शपथेचा भंग आहे. पण देशाचे पंतप्रधान या प्रकारची भूमिका देशासमोर मांडतात, याची मला गंमत वाटते.भाजपाचे मंत्री लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंपर्क यात्रा काढत आहेत. मागील पाच वर्षांत ज्यांना देशातले मतदारसंघ कळाले नाहीत. मंत्री कोण आहेत कोण कोठे काम करतात हे देशातील लोकांनाच माहीत नाही. ते दाखविण्यासाठी या मंत्र्यांच्या जनसंपर्क यात्रा सुरू आहेत. यापेक्षा वेगळे काही नाही. आजपर्यंत मिश्रा नावाचे मंत्री आहेत हे मी तरी ऐकले नव्हते .पण ते सातारा जिल्ह्यात आल्यानंतर कळले.

हेही वाचा – “…त्यापेक्षा आत्महत्या करणं चांगलं”; नागपुरात लेस्बियन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

राज्यात अनेक कामे प्रलंबित आहेत. सरकारच्या निर्णयासाठी अनेक फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकांची कामे होत नसल्याची व अधिकाऱ्यांवर दबाव असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे, यावर बोलताना पवार म्हणाले, अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. राज्यात कुठे काय चालले आहे याची त्यांना माहिती असते. त्यामुळे या विषयावर भाष्य करण्याचा त्यांना अधिकार आहे. आज कर्नाटक प्रचारात आणि जिथे जाऊ तिथे ४० टक्के कमीशनची चर्चा केली जाते. आज आपल्याकडे ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात काहीना काही आहे. ते लोकांनी ते अनुभवलंही आहे. काही लहान मुलं शाळेत निघाली होती. तिथून एका राजकीय पक्षाची गाडी गेली. ते पाहून त्या मुलांनी घोषणा दिल्या, गद्दार गद्दार खोकेवाले खोकेवाले. आता हे ९-१० वर्षांची मुलं बोलायला लागली असतील, तर खोक्यांचा संदेश कुठवर आणि खोलवर गेलाय ते सगळीकडे दिसत आहे.

आम्ही कर्नाटकमध्ये नऊ उमेदवार उभे केले आहेत. या नऊ जागांनी काही फरक पडणार नाही, हे आम्हाला माहित आहे. परंतु आम्ही सर्व समाजाच्या उमेदवारांना येथे प्राधान्य दिले आहे आणि आम्हाला कर्नाटकमध्ये राजकारणात प्रवेश करायचा असल्यामुळे आम्ही तेथे उमेदवार दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.

भाजपामध्ये आदेश देण्याची संस्कृती आहे, शिंदेंना ती मान्य करावीच लागते. केंद्रातून जो आदेश येतो तो बिचारे शिंदेंना पाळावा लागतो . शिंदेंचं मुख्यमंत्रीपद भाजपाच्या आमदारांवर आहे. केंद्रातून जो आदेश येईल तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो. म्हणून ते कर्नाटकात प्रचारासाठी गेले म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – “आम्ही ‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”; शरद पवारांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले…

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना अजिबात नुकसान भरपाई मिळालेली नाही. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. संसदीय लोकशाही बरखास्त करण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे, असेही पवार म्हणाले. सध्याच्या सरकारने महागाई बेरोजगारी आणि अनेक विषय हे बासनात बांधून ठेवले असल्याची टीकाही पवारांनी केली.