मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतले आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. केरे यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १० ते १५ दिवसांपूर्वी मला तुम्हाला भेटायचे आहे, असे संदेश त्यांनी मला पाठवले होते, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन

रमेश केरे यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत माझ्याकडे अधिक माहिती नाही. ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते कदाचित औरंगाबादचे आहेत. मागील १० ते १५ दिवसांपूर्वी त्यांनी मला तुम्हाला भेटायचे आहे, चर्चा करायची आहे, अशा आशयाचे दोन ते तीन मेसेजेच केले होते. मात्र त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची टोकाची भूमिका घेतली आहे असे समजत आहे. त्याची माहिती मी घेईन, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा >>> “दगडफेक व्हायची, डोकी फुटायची” शिवसेनेतील बंडखोरीनंतर काय घडलं? छगन भुजबळ यांनी सांगितली आठवण

रमेश केरे पाटील हे मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये दोन व्यक्ती बोलत असल्याचे दिसतेय. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी केरे यांनी पैसे घेतले, असा आरोप या ऑडिओ क्लीमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर माझा याच्याशी संबंध नसल्याचे केरे यांनी सांगितले होते. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून ही ऑडिओ क्लीप व्हायरल होत असल्यामुळे माझी बदनामी होत असल्याचे म्हणत रमेश केरे यांनी विष प्राशन केले. मुंबईत असताना त्यांनी विष प्राशन केले असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on maratha kranti morcha coordinator ramesh kere suicide attempt prd