पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचं भाषण करताना पुन्हा सत्तेत येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याशी झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “आज सत्तेचा धडाधड गैरवापर सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेले घटक अधिकारांचा गैरवापर करून राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपल्याला यश मिळणार नाही ही खात्री पटते, तेव्हा या रस्त्याला माणूस जातो.”

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन

“मला सध्या देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकुल दिसत नाही”

“मला सध्या देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकुल दिसत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा. केरळमध्ये आज भाजपा नाही. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपा नाही. महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नव्हतं, ते आता आलं आहे. गोव्यातही भाजपाचं सरकार नव्हतं, तेही अशाच पद्धतीने आणलं,” असं शरद पवार यांनी म्हटलं.

“मध्य प्रदेशमध्ये भाजपाने कमलनाथ यांचं सरकार पाडलं”

शरद पवार पुढे म्हणाले, “गुजरातमध्ये भाजपाचं सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचं सरकार पाडलं आणि भाजपा सत्तेत आली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आहे. राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार नाही. दिल्ली-पंजाबमध्ये भाजपाचं सरकार नाही. उडिशामध्ये भाजपाचं सरकार नाही. झारखंडमध्ये नाही, ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत नाही.”

हेही वाचा : अजित पवारांनी तुम्हाला भाजपाबरोबर येण्याचा किंवा तटस्थ राहण्याचा प्रस्ताव दिला का? शरद पवार म्हणाले…

“मी पुन्हा येईन असं कितीही जोरात सांगितलं तरी मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल”

“याचा अर्थ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच लोकांनी यांची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार केलेला दिसत आहे. हे चित्र आगामी निवडणुकीत दिसेल. त्यामुळे यांनी कितीही जोरजोरात सांगितलं की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन तरी मोदींची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल. याबाबत माझ्या मनात शंका नाही,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Story img Loader