अलीकडेच वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. पण, त्यांच्यात काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नव्हतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीवर आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमागाचं काय कारण आहे? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “…त्यावेळी राऊत एकनाथ शिंदेंच्या पाया पडलेले”, संजय शिरसाटांचं वक्तव्य, म्हणाले, “जुगाडामुळे…”

“आंबेडकरांशी आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळ्या असतील, तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा केली आहे. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडं पाठवणार आहे. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल. यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  “मी माझ्या वक्तव्यावर ठाम असतो”, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राम पाहण्याची दृष्टी…”

२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का? वंचित आघाडीही बरोबर असेल का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने शरद पवारांना विचारला. त्यावर त्यांनी म्हटलं, “वंचित आघाडीबरोबर २०२४ च्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. वंचितशी आमची चर्चा कर्नाटकातील विधानसभेपूर्ती मर्यादित आहे. दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण, इच्छा नेहमीच पुरेसी नसते. जागा वाटपाबद्दल अजून ठरलेलं नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on prakash ambedkar meet in yb chavan center say talk karnatak election ssa
Show comments