राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून राजकीय वर्तुळातले अनेक जण तसंच त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही शरद पवार यांना शायरीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक शेरही लिहिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, “चल रहा युद्ध हो, वक्त भी विरुद्ध हो। फिर भी आपको लढना है, क्योंकी आपकी पहचान एक ‘योद्धा’ है। शरद पवार साहेब, लवकर बरे व्हा; काळजी घ्या !!”
शरद पवार यांना करोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.