अजित पवारांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ८३ वर्षांचा योद्धा असं वर्णन त्यांचं केलं जातं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जो प्रचार सुरु केला आहे त्यातून त्यांचा उत्साह किती दांडगा आहे ते दिसून येतं आहे. आज बारामतीतल्या उंडवडी या ठिकाणी त्यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी अजित पवारांवर तुफान टीका केली. तसंच सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा किस्साही सांगितला आणि तुटलेल्या कपातून चहाचाही किस्सा सांगितला.

काय म्हणाले शरद पवार?

“काही लोक पक्ष सोडून गेले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केली? लोक निवडून कुणी आणले? मंत्रिपदं कुणी दिली? माझं वय काढू नका, मी थांबणारा गडी आहे लक्षात ठेवा. ” असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता टीका केली आहे.

Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
aai kuthe kay karte fame abhishek and ankita reunion
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Sanjay Shirsat On Sujay Vikhe Patil
Sanjay Shirsat : “देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान”, सुजय विखेंच्या विधानावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

तुटलेल्या कपाचा किस्सा

शरद पवार म्हणाले, “इथे उद्योग आले, पण घर बदललं का? पहिल्यांदा चहा पितळेच्या भांड्यात मिळायचा, मग कान तुटलेला कप आला. त्यानंतर परिस्थिती बदलली. राहणीमान बदललं आहे. त्याचं कारण इथे बरीच काम झाली आहेत.”

सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा किस्सा

आपल्या भाषणात शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा किस्सा सांगितला. सुप्रिया सुळे यांचं लग्न होतं तेव्हा मुलीचं लग्न आहे असं समजून अनेकांनी कार्यात भाग घेतला. सुप्रियाचं लग्न झालं तेव्हा लग्नात येणाऱ्या पाहुण्याचं सगळ्यांनी स्वागत केलं. सुप्रिया माझी मुलगी आहे असं सगळ्यांना वाटत होतं ही गोष्ट मी कधीही विसरु शकत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “५६ वर्षांत मी एकही सुट्टी घेतली नाही”, शरद पवारांचं विधान चर्चेत; म्हणाले, “शेतकरी आपल्या बैलाला…”

माझे विरोधक आणि इतर काही लोक म्हणत आहेत की माझं वय ८४ झालं आहे. माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे? मी थांबणार नाही. तुम्ही मला चार वेळा मुख्यमंत्री केलेलं नाही. कृषी मंत्री केलेलं नाही. मी ५६ वर्षे काम केलं आहे. एकही सुट्टी घेतलेली नाही. बैल पोळ्याला बैलालाही एक दिवस सुट्टी देतात. मी ५६ वर्षांत एकदाही सुट्टी घेतलेली नाही असाही उल्लेख शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader