राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोंधळासंदर्भात बोलताना पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “‘सिल्व्हर ओक’वर जे झालं तो माझ्या आईवर हल्ला होता,” असं मत व्यक्त केलंय. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नक्की वाचा >> “येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया यांनी, “सिलव्हर ओकवर जे झालं तो माझ्या आईवर हल्ला होता. माझे आई-वडील, मी मुलगी एक. जर तुम्ही माझ्या जागेवर असते तर तुम्ही काय केलं असतं. तुम्ही काय वेगळं केलं असतं?,” असा प्रतिप्रश्न पत्रकारांनाच विचारला. तसेच पुढे बोलताना या सर्व प्रकरणानंतर, “मी आजही हे प्रांजळपणे सांगते की मी पोलीसांना संपर्क साधून विनंती केली की तिथल्या महिलांना मला भेटायचं आहे. त्या आपल्या आहेत. त्या महाराष्ट्रातील महिला आहेत. त्यांना का वेदना होतात हे समजून घेणं एक महिला म्हणून माझी जबाबदारी आहे,” असंही सुप्रिया यांनी म्हटलं.

नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…

आंदोलनकर्त्या महिलांच्या वेदना समजून घेणं ही माझी जबाबदारी असल्याचंही सुप्रिया यांनी सांगितलं. “त्या माझ्या घरी आल्या होत्या. त्या कशा वागल्या याला महत्व नाहीय. पण ते का वागले? ही मराठी संस्कृतीच नाही. हे समजून घेणं माझी जबाबदारी नाही का?,” असं सुप्रिया पत्रकार परिषदेत म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना, “माझं राज्य, माझा देश ही माझी आई आहे. माझ्या आईच्याविरोधात कोणी काही केलं असेल मी स्वत:हून काही करणार नाही पण तिला जपण्याची आणि काळजी घेण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

आज सुप्रिया सुळे या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर येथील रुक्मिणी हॉल येथे पत्रकार परिषद घेतली. “संपावर असलेल्या एसटी कर्मचारी यांनी कोणाच्या सांगण्यावरून माझ्या घरावर हल्ला केला हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही,” असं यावेळी सुप्रिया यांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना, “घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असंही त्यांनी म्हटलं. “महाराष्ट्रातील विरोधकांनी राजकारणामध्ये एकदम खालची पातळी गाठली याची चित्र मुंबईतील घरावरच्या आल्याच्या प्रकरणावरून दिसून आले आहे. मी महिला असल्याने आणि संपातील महिलेची मी बोलण्याचा प्रयत्न केला एक महिला म्हणून मी दुसऱ्या महिलेची भावना समजू शकते. मात्र घरावर हल्ला करणे ही चुकीचे होते,” असं स्पष्ट मत सुप्रिया यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

“औरंगाबाद शहर पर्यटन शहर म्हणून याची ओळख आहे. अजिंठा-वेरूळसारख्या लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात असून एकदा अजितदादांना घेऊन मी अजिंठा लेणी पाहण्यासाठी नक्कीच येणार आहे,” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader