अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करून रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात खुद्द अजित पवार यांना सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून पद मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे अजित पवार गटाकडून ४० हून जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे असाच दावा शरद पवार गटाकडूनही केला जात आहे. या बंडखोरीनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आता टीका सुरू झाली असून त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज खोचक ट्वीट केलं आहे.

रोहित पवारांचं खोचक ट्वीट!

रोहित पवारांनी केलेल्या खोचक ट्वीटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या नकाशाच्या मध्ये शरद पवारांचा फोटो लावण्यात आला असून त्यांच्याभोवती काही लोक उभे असल्याचं दिसत आहे. या नकाशाच्या बाहेरच्या बाजूला चार कुत्रे भुंकत असल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

काय आहे ट्वीटमध्ये?

रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. त्यातून सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात..

अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

पक्ष एक, बैठका दोन!

अजित पवार गटाने राज्य सरकारला पाठिंबा जाहीर केला असतानाही आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असून शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत, असं अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, शरद पवारांनी या भूमिकेला विरोध केल्यामुळे पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी पक्षाच्या दोन स्वतंत्र बैठका आयोजित करण्यात आल्या. यातली एक अजित पवार गट तर दुसरी शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आली.

Story img Loader