मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला महत्त्वाचं कारण ठरलेत ते म्हणजे मनोज जरांगे. त्यांना आव्हान देणारं नावही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ते नाव म्हणजे लक्ष्मण हाके यांचं. लक्ष्मण हाके हे रीतसर अभ्यासपूर्ण पद्धतीने मनोज जरांगेंच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत ते सांगत आहेत. याच लक्ष्मण हाकेंनी आता एक गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी माझं तिकिट फायनल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मण हाकेंना काय विचारण्यात आलं?

राजकारणात आणि सभागृहात सामाजिक समोतोल साधायचा असेल तर एखाद दुसरं तरी प्रतिनिधीत्व पुढे आलं पाहिजे. पण प्रतिनिधींना टार्गेट केलं जातं. ही महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले होते. तो संदर्भ घेऊन तुम्ही लोकसभा निवडणूक लढवली पण तुम्हाला जनतेनं नाकारलं. तुम्ही उमेदवारी मागायला शरद पवारांकडे गेला होतात का? हे विचारलं असता हाके यांनी उत्तर दिलं.

हे पण वाचा- Lakshman Hake On Manoj Jarange: “भुजबळांना बदनाम करण्याचा…”; लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

हो, मी उमेदवारी मागायला शरद पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी शरद पवारांनी माझी उमेदवारीही जाहीर केली होती. पुढे काय झालं ते त्यांनाच माहीत असा गौप्यस्फोट लक्ष्मण हाकेंनी केला. माढा या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी जिथून लढलो तिथे मला पाच हजार मतं मिळाली. आपला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे ही भावना समाजात नाही. धनगराने कुठं खासदार व्हायचं असतं का? त्याने कुठे तिकिट मागायचं असतं का? रामोश्याने काय लोकसभेचं तिकिट मागायचं असतं का? असे प्रश्न विचारले जातात. ही समाजातली फॅक्ट आहे. असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

माढा मतदारसंघात लक्ष्मण हाकेंना अवघी ५ हजार मतं

लक्ष्मण हाकेंनी माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली असून या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. लक्ष्मण हाकेंना केवळ ५ हजार १३४ मतं मिळाली. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या ३२ उमेदवारांपैकी त्यांना सहाव्या क्रमांकांची मतं मिळाली आहेत. येथील मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला ५८ हजार ४२१ मतं मिळाली असून चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारास २० हजार ६०४ मतं पडली आहेत. पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाचे स्वरुप जानकर उमेदवार होते, त्यांना ७ हजार ९४ मतं मिळाली. तर, सहाव्या क्रमांकावरील लक्ष्मण हाके यांना ५ हजार १३४ मतं पडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar finalized my ticket for loksabha election said laxman hake and reavill the secret scj
Show comments