Sharad Pawar : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला पार पडला. नागपूर येथील अधिवेनशाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या ऐन थंडीत राजकीय गरमागरमी पाहण्यास मिळाली. कारण अनेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. छगन भुजबळ यांची नाराजी ही सर्वाधिक असल्याचं दिसून आलं. कारण त्यांनी शक्तिप्रदर्शन करत थेट जहा नहीं चैना वहाँ नहीं रहना अशीच भूमिका घेतली. या सगळ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला मंत्रिपदाची हाव नाही : छगन भुजबळ

“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, असं छगन भुजबळ यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं.

अवहेलनेचं शल्य माझ्या मनात- छगन भुजबळ

“मंत्रिपद मिळालं नाही तरीही मी रस्त्यावर आहे. अवहेलनचं शल्य मनात आहे. मी तुम्हा सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेन. मै मौसम नहीं जो पल में बदल जाऊं, मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ, ऐसेही फेक न देना तुम्हारे बुरे वक्तमें”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्याबाबत सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. तसंच आता शरद पवार ( Sharad Pawar ) यांनीही प्रतिक्रिया दिली.

हे पण वाचा- Chhagan Bhujbal Samta Parishad Baithak : छगन भुजबळ यांचं आक्रमक भाषण “कभी ना डर लगा मुझे फासला देखकर…”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

“छगन भुजबळ आमच्याबरोबर होते तेव्हा त्यांना कायमच मान देण्यात आला. शरद पवार यांच्या शेजारीच त्यांची खुर्ची असायची. आता जी काही नाराजी वगैरे आहे तो सगळा त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय आहे.” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. तर आता शरद पवार ( Sharad Pawar ) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मला शरद पवारांनी सन्मान दिला. पण आता सन्मान मिळत नाही. याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “ते सगळं तुम्ही त्यांना विचारा, मला काय माहीत?” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दिली आहे.

Story img Loader