* रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक घटले
केंद्रीय कृषीमंत्री व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने पुण्याला आणण्यात आले. तपासणीनंतर शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. कोल्हापूर येथील सरपंच महापरिषदेनंतर शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सागंली व पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त यांच्या स्मारकाच्या कोनशीलेच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार होता. यावेळी शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग एकाच मंचावर येणार होते. परंतु, रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक घटल्याने शरद पवार यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. 

Story img Loader