राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. खुद्द शरद पवार पुन्हा पक्षबांधणी करण्यासाठी मैदानात उतरल्यामुळे त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले असून त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असून साताऱ्यात बोलताना त्यांनी या सर्व बंडखोरी प्रकरणावर भाष्य केलं आहे.

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून टोला

अजित पवारांनी शपथविधीनंतर भाजपासोबत जाण्यात काहीही चूक करत नसल्याचं विधान केलं होतं. अडीच वर्षांपूर्वी जर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाऊ शकते, तर मग आत्ता आम्ही भाजपासोबत जाऊन काहीही चूक केलेलं नाही, असं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. यासंदर्भात साताऱ्यात शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी आणीबाणीच्या वेळचा एक संदर्भ देत टोला लगावला.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

“देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा…”

“देशात आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा देशातील अनेक राजकीय पक्षांनी, माध्यमांनी इंदिरा गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्या काळात इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे असं म्हणणारा एकच पक्ष आणि नेता होता. नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचं नाव शिवसेना. त्यानंतर जी निवडणूक झाली, त्यात शिवसेना हा एकच पक्ष होता ज्यानं एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आत्ता आम्ही वेगळं काही करतोय असं नव्हे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

बंडानंतर अजित पवार गटाला पहिला धक्का; अमोल कोल्हेंनी शरद पवारांसोबत असल्याचं केलं जाहीर!

“वेगळं काहीतरी घडतंय असं सांगण्याचं कारण नाही. यांना हे आज कळलं. अडीच वर्षांपूर्वी आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनीही शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज ते जे म्हणतायत त्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही”, असा टोला शरद पवारांनी केला.

“मी द्वेषाचं राजकारण करत नाही”

दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी तो अधिकार जयंत पाटलांचा असल्याचं नमूद केलं आहे. “त्यांना अपात्र करायचं की नाही याचा विचार मी करणार नाही. तो विचार जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी करतील. मी कुणाच्याही बद्दल नाराजी व्यक्त करत नाही. काही सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण त्यासाठी मी मनात द्वेष ठेवून राजकारण करत नाही. त्यांनी जर भेटायची वेळ मागितली, तर विचार करू”, असं म्हणत अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांसाठी परतीची संधी खुली असल्याचे संकेतच शरद पवारांनी यावेळी दिले.

“सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…”, राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे सगळे असेच जाणार नाहीत तिकडे!”

“कार्यकर्ते का नाराज होते हे मला आज कळलं”

दरम्यान, रामराजेही अजित पवारांसोबत गेल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “आज ते इथे उपस्थित नाहीत याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधून-मधून नाराज का होते, ते मला कळलंय”, असं सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केलं.

Story img Loader