अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचं विधान पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केलं होतं. त्या विधानावर आज सकाळी शरद पवारांना बारामतीतील पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असता ते पक्षाचे नेते असल्याचं शरद पवारांनीही म्हटलं होतं. मात्र दुपारी साताऱ्याच्या दहिवडीमधील पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी आपण असं विधान केलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी घेतलेल्या या दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

अजित पवारांबाबत सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. “अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे”, असं शरद पवार म्हणाले होते.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया

दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काँग्रेसकडून आमच्यासोबत असणारे आमच्यासोबतच आहेत, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळेंनी “शरद पवार व सुप्रिया सुळे लवकरच भाजपाला पाठिंबा देतील”, अशी टिप्पणी केली. संजय राऊतांनी यावर बोलताना “ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूटच आहे असं आम्ही मानतो”, असं माध्यमांना सांगितलं.

Video: अजित पवार पुन्हा माघारी येणार? शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चेला उधाण! २०१९ ची पुनरावृत्ती होणार का?

एकीकडे राजकीय वर्तुळात पवारांच्या विधानाचे पडसाद उमटू लागल्यानंतर दुसरीकडे दुपारी शरद पवारांनी त्यावर स्पष्टीकरण देताना वेगळी भूमिका घेतली. “कारवाईची मागणी आम्ही केली आहे. माझ्या पक्षात असताना कुणी पक्षाच्या ध्येयधोरणाविरोधात भूमिका घेतली. आम्ही त्यावर संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया केली याचा अर्थ पक्षात फूट नाही. ही फूट नाही. चुकीचं वागण्यासंदर्भात घेतलेली ही भूमिका आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

‘अजित पवार पक्षाच नेते आहेत’ या विधानावरील प्रतिक्रियांबाबत विचारणा केली असता “मी कुणाशीही या विषयावर बोललेलो नाही. मी असं म्हणालो की ते आमचे नेते आहेत? हे चूक आहे. सुप्रिया असं म्हणाली. सुप्रिया सुळे असं म्हणू शकतात. जी भूमिका आमच्या या सहकाऱ्यांनी घेतली, ती आमची कुणाचीही भूमिका नाही”, असं शरद पवार म्हणाले.

अजित पवार माघारी आल्यास पुन्हा संधी देणार? शरद पवारांनी घेतली ठाम भूमिका; म्हणाले, “पहाटेच्या शपथविधीनंतर…!”

चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

दरम्यान. “शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील”, या बावनकुळेंच्या विधानावरून शरद पवारांनी टोला लगावला. “मी त्यांना अलिकडच्या काळातच ओळखायला लागलो. साधारणपणे या पदावर जाणाऱ्या व्यक्तीने बोलताना तारतम्य पाळण्याची पद्धत असते. त्याचं एक वक्तव्य मी वाचलं की आम्ही अमुक लोकांवर टीका करू नये. उद्या त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली तर कदाचित ते बोलू शकतात. पण आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांवर टीका केली तर ती यांना का लागते मला माहिती नाही. त्यासंदर्भात यांचं मार्गदर्शन कुणी मागितलंय? ते जे बोलतायत त्यात तारतम्य नाही. त्यामुळे ज्यांच्या बोलण्यात तारतम्य नाही, त्यांना आपण फारसं महत्त्व देऊ नये”, असं शरद पवार म्हणाले.