Sharad Pawar : निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार. शेवटच्या रविवारी विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत. विरोधकांवर टीकास्र डागलं जातंय. गेल्या अडीच वर्षांत बदललेल्या समीकरणांचा आढावा घेतला जातोय. त्यावरून मतदारांना आवाहन केलं जातंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशाराच दिला आहे. सर्वांचा नाद कराचा, पण…. असं म्हणत शरद पवारांनी आज टेंभुर्णी येथील सभा गाजवली.

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यांचे ४० आमदार त्यांना सोडून गेले. परिणामी पक्षात दोन गट पडले. पण शरद पवारांसाठी हा अनुभव नवा नव्हता. १९८० सालीही त्यांना अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी त्यांना सोडून गेलेल्या आमदारांचा कसा पराभव केला याचं उदाहरण देत आताच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

निवडून आणलेले आमदार सोडून गेले

शरद पवार म्हणाले, “१९८० सालात निवडणूक झाली. त्या निवडणुकीत माझ्या आणि सहयोगी पक्षाच्या वतीने एकंदरीत ५८ लोक निवडून आले. मी ५८ लोकांचा नेता झालो. विरोधी पक्षनेता झालो. एकदा मी चार दिवसांकरता परदेशी गेलो आणि परत आलो तर तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी काहीतरी चमत्कार केला होता. निवडून आलेल्या ५८ आमदारांपैकी ५२ आमदारांना ते घेऊन गेले. त्यामुळे सहा लोकांचा नेता राहिलो. विरोधी पक्षनेतेपद गेले.”

हेही वाचा >> Pratibha Pawar: “बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखले”, सुप्रिया सुळेंच्या दाव्यामुळे राजकारण तापले

…अन् सोडून गेलेले ५२ आमदार पडले

“आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. तीन वर्षे अहोरात्र प्रयत्न केले. निवडणुकीला जे मला सोडून गेले, त्यांच्याविरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या जनतेला की ते ५२ लोक निवडणुकीत पडले”, असा अनुभव शरद पवारांनी शेअर केला.

ते पुढे म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं पाडायचं नाही. जोरात पाडायचं. पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा…”, असं म्हणताच समोर बसलेल्या समर्थकांमधून आवाज आला की नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही.”