Premium

“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया

मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.

Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
शरद पवारांच्या टीकेला अनिल पाटील यांचं प्रत्युत्तर (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे”, असं वक्तव्य करून शरद पवारांनी वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख सुनेत्रा पवारांकडे होता असं म्हटलं जातंय. यावरून अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केलाय, असं ते म्हणाले.

शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केल्यासारखं वक्तव्य केलं आहे. लेकीला सुनेसारखं वागवा, असं शरद पवारांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु, सुना बाहेरच्या असतात, असं ते म्हणाले. महिलांना प्राधान्य देणारे पवारांनी हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं, असं अनिल पाटील म्हणाले.

uday samant won in ratanagiri assembly
Maharashtra Vidhan Sabha Result : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून उदय सामंत विजयी
Devendra Fadnavis On Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Devendra Fadnavis : विधानसभेत महायुतीला मोठं यश, मुख्यमंत्री…
no alt text set
Swara Bhaskar : पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करचा संताप; म्हणाली, “९९ टक्के चार्ज EVM उघडल्या अन्…”
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : अजित पवार यांची निकालांवर पहिली प्रतिक्रिया “लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, महाराष्ट्रात इतकं मोठं यश..”
Rohit Patil WonTasgaon Kavathe Mahankal Election as Youngest Candidates
Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Election : महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री, आज लेकाने मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Election result Who is next cm of Maharashtra Shrikant Shinde answered
Maharashtra Election 2024: कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? श्रीकांत शिंदे म्हणाले “तुम्हाला सर्वांना लवकरच…”
Devendra Fadnavis Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Devendra Fadnavis : “आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडला…”, विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
aaditya thackeray
Aaditya Thackeray Won : आदित्य ठाकरेंनी गड राखला; वरळीतून मिलिंद देवरांचा दारुण पराभव!

“मुळात या वक्तव्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. सुना या बाहेरून आलेल्या असल्या तरी त्यांना लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे हे वक्तव्य अपेक्षित आहे. पूत्रप्रेम राहिलं नाही म्हणून सुनेला तिरस्काराची भावना येत असेल तर असं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कोणीच करू शकत नाही”, असंही अनिल पाटील म्हणाले.

हेही वाचा >> Photo : “ते धृतराष्ट्र झाले”, सर्वपक्षीय महिला नेत्या शरद पवारांवर का संतापल्या?

नेमकं प्रकरण काय?

बारामतीतील जनतेशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.” गेल्या काही वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु, राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे या पक्षात फूट पडली आहे. परिणामी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच घरातील भावजय-नणंदा आमनेसामने आल्या आहेत. परिणामी, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शरद पवारांनीही त्यांना प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले “मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar insulted daughters in law of maharashtra strong reaction from ajit pawar group on that statement sgk

First published on: 13-04-2024 at 12:14 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या