राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील उत्तरसभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. आमचं काय चुकलं असा प्रश्न विचारून आमच्यावर हल्ले का केले जातायत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी शरद पवारांना वेळोवेळी कशी मदत केली याचाही उल्लेख केला.

छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळ अडीच वर्षे आतमध्ये गेला. प्रॉपर्टी अटॅच झाली. समीर भुजबळही आतमध्ये गेला. तरीही घाबरलो नाही. बाहेर आल्यावर पुन्हा तुमच्याबरोबर उभे राहिलो. तुम्ही म्हणता घाबरले म्हणून गेले. छगन भुजबळ घाबरला नाही, छगन भुजबळ तुमच्याबरोबर राहिला. १९९१ पासून तुमच्याबरोबर आहे, ज्यावेळी काँग्रेसमधून तुम्हाला बाहेर काढलं तेव्हा कोणी नव्हतं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता जो तुमच्याबरोबर उभा राहिला.”

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर

हेही वाचा >> “राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारच, कारण…”, छगन भुजबळांचा ठाम दावा; म्हणाले…

“काँग्रेसचे मुकुल वासनिक, कलमाडी, माधराव शिंदे, शिला दिक्षित सतत फोन करत होते, भुजबळ तुम्ही दिल्लीला या. पवारांसोबत जाऊ नका, सांगत होते. पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला जाहीर करतो, असं आश्वासन दिलं. कारण शिवसेना आणि काँग्रेसला विरोधी पक्षनेता म्हणून अंगावर घेतलं होतं. एवढं अंगावर घेतलं होतं की घरावर हल्ला झाला. तुमच्या आशीर्वादाने छगन भुजबळ वाचला”, असंही छगन भुजबळ म्हणाले. “काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. दादा म्हणाले दोनवेळा मुख्यमंत्री पद गेलं. दादा असंच असतं राजकारणात”, असंही ते खेदाने म्हणाले.

“साहेब आम्ही तुमच्यासोबत राहिलो की नाही हा प्रश्न आहे. आमचं काय चुकलं? आमच्यावर का हल्ले करताहेत. अमरसिंह पंडितांचं नाव घेऊन काहीतरी बोलता. दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स कधीपासून करायला लागलात? हे तुम्हाला शोभत नाहीत. आम्ही तुमच्याकडून शिकलो, पण असं बोलायला आम्ही शिकलो नाही. पण तुम्हीच असं बोलायला लागलात”, असंही भुजबळ म्हणाले.

Story img Loader