राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काही वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कणकवली येथील राणेंच्या घरी शरद पवार दाखल झाले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या शरद पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. एकीकडे निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. या पार्श्वभूमीवर पवार-राणेंच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

Story img Loader