सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर टोलेबाजी चालू असताना दुसरीकडे फडणवीसांनी शरद पवारांविषयी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं. यावेळी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख करत १९७८ च्या घडामोडींचा संदर्भ दिला. त्यावरून शरद पवारांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष्य करताना १९७७ साली त्यांनी स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Nana Patole Criticize Devendra Fadnavis ,
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…
devendra fadnavis on sudhir mungantiwar
Devendra Fadnavis : “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

“पवारसाहेब तुम्ही केली तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली तर…”, फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!

“फडणवीसांना पुरेसा इतिहास माहिती नाही”

दरम्यान, आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना पत्रकारांनी या वक्तव्याविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यावरून फडणवीसांनाच टोला लगावला. “मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावं. १९७७ साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते”, असं शरद पवार म्हणाले.

“मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची गरज नाही”, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

“फडणवीसांचं वाचन किती आहे मला माहिती नाही”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावरूनही शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली. “हेही फडणवीसांचं अज्ञानच आहे. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर पिचड होते. सुनील तटकरे होते. हे सगळे कोण आहेत? ही सगळी यादी बघा. अर्थात त्यांचं वाचन किती आहे ते मला माहिती नाही. या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता ते विधानं करतात. ठीक आहे, लोकांना माहिती असतं. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरून नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Story img Loader