गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीमधील संबंधांवर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवारांचा आधी राजीनामा आणि नंतर तो मागे घेण्याचा निर्णय यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यापाठोपाठ ठाकरे गटाकडून ‘शरद पवार वारसदार तयार करण्यात अपयशी ठरले’ अशी प्रतिक्रिया देण्यात आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या भूमिकेवर सोमवारी शरद पवारांनी नेमकी भूमिका वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देणार नाही, असं म्हटलं होतं. आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी या टीकेवर सविस्तर आणि सूचक स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय होती ठाकरे गटाची टीका?

ठाकरे गटाकडून ‘सामना’तील अग्रलेखातून शरद पवारांच्या राजीनामा प्रकरणावर भूमिका मांडण्यात आली होती. त्यामध्ये “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले”, असं नमूद करण्यात आलं होतं. तसेच, “राजीनाम्याच्या घोषणेमुळे देशाच्या राजकारणात खळबळ माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली”, असंही ठाकरे गटानं म्हटलं होतं.

शरद पवार म्हणतात, “माझ्या निर्णयाचा लाभ होईल”

“अनेक राज्यांतून अनेक जाणकारांकडून सूचना आल्यानंतर हा निर्णय मला मागे घ्यावा लागला. लोकशाहीत लोकांची इच्छा काही मर्यादेपलीकडे डावलता येत नाही. निर्णय मागे घेतल्यानंतर पक्षसंघटनेचं काडर अधिक जोमाने काम करण्याच्या उमेदीत आहे. त्याचा पक्षाला लाभच होईल असं दिसतंय”, असं शरद पवार म्हणाले.

ठाकरे गटाच्या भूमिकेवर सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, कुणी असं काही लिहिलं, तर त्याला आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. “आम्ही काय केलंय हे त्यांना माहिती नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही पक्षाचे सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नसतो. हा आमच्या घरातला प्रश्न असतो. आमच्या प्रत्येक सहकाऱ्याला हे माहिती असतं की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्वाची फळी पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, त्यामुळे…”, ठाकरे गटाचं मोठं विधान

“एक उदाहरण सांगतो. ९९ साली जेव्हा आम्ही काँग्रेसबरोबर राज्यात सत्तेवर आलो, त्यावेळी मंत्रीमंडळ तयार करायचं होतं. तेव्हा नव्या मंत्रीमंडळात ज्या सहकाऱ्यांना सहभागी केलं, त्यात जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, देशमुख, आर आर पाटील होते. अशी अनेक नावं आहेत की त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्तेचा काळ होता. मी मंत्रीमंडळात होतो पण माझी सुरुवात राज्यमंत्रीपदापासून झाली. तिथे काही वर्षं काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळालं. पण आत्ता मी ज्यांची नावं घेतली, त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून आम्ही नियुक्ती केली. महाराष्ट्रानं हे पाहिलं की त्या प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तृत्व दाखवलं. त्यामुळे आम्ही वारसदार तयार करतो किंवा करत नाही हे कुणी लिहिलं तर याचं महत्त्व आमच्या दृष्टीने काही नाही. ते लिहितील. त्यांचा लिहायचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही काय करतो. त्याच्यात आम्हाला समाधान आहे”, असं शरद पवार म्हणाले.